Posts

Showing posts from December, 2020

मतदान

       पक्षशाही बंद करून लोकशाही निवडा             प्रतिनिधी लोकांमधून जरी निवडून जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांचे उमेदवार नसतात. ते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार असतात. राजकीय पक्ष त्यांना हव्या त्या माणसांना उमेदवारी देतात; लोकांना योग्य वाटणाऱ्या माणसांना नाही. त्यामुळे ती लोकशाही नसून पक्षशाही आहे. तशा व्यवस्थेत प्रतिनिधी उत्तरोत्तर बलदंड होत जातात आणि जनता मात्र दुबळी राहते.          भारताने प्रातिनिधिक, संसदीय लोकशाहीचे प्रतिमान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वीकारले. भारत हा देश खंडप्राय असल्याने केंद्र पातळीवर आणि राज्यांच्या स्तरावर कारभार चालवण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र लोकांचा लोकशाहीबद्दलचा अनुभव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर वर्षांनी काय आहे? तर तो आहे हताशपणाचा, असहायतेचा आणि नागरिक म्हणून आलेल्या दुबळेपणाचा. देशात निवडणुका नियमित होतात, पण प्रत्येक निवडणुकीनंतर ती हताशता अधिकाधिक वाढत जाते. लोकांचा निवडणूक यंत्रणेवरी विश्वास उडालाय. हे असे का होते? त्याचे कारण म्हणजे ह्या लोकशाहीत सगळी सत्ता ही प्रतिनिधींच्या हातात एकवटल