मतदान


       पक्षशाही बंद करून लोकशाही निवडा
  
         प्रतिनिधी लोकांमधून जरी निवडून जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांचे उमेदवार नसतात. ते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार असतात. राजकीय पक्ष त्यांना हव्या त्या माणसांना उमेदवारी देतात; लोकांना योग्य वाटणाऱ्या माणसांना नाही. त्यामुळे ती लोकशाही नसून पक्षशाही आहे. तशा व्यवस्थेत प्रतिनिधी उत्तरोत्तर बलदंड होत जातात आणि जनता मात्र दुबळी राहते.
         भारताने प्रातिनिधिक, संसदीय लोकशाहीचे प्रतिमान स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वीकारले. भारत हा देश खंडप्राय असल्याने केंद्र पातळीवर आणि राज्यांच्या स्तरावर कारभार चालवण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र लोकांचा लोकशाहीबद्दलचा अनुभव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर वर्षांनी काय आहे? तर तो आहे हताशपणाचा, असहायतेचा आणि नागरिक म्हणून आलेल्या दुबळेपणाचा. देशात निवडणुका नियमित होतात, पण प्रत्येक निवडणुकीनंतर ती हताशता अधिकाधिक वाढत जाते. लोकांचा निवडणूक यंत्रणेवरी विश्वास उडालाय. हे असे का होते? त्याचे कारण म्हणजे ह्या लोकशाहीत सगळी सत्ता ही प्रतिनिधींच्या हातात एकवटली जाते. लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात. पण ते प्रतिनिधी लोकांवर राज्य करू लागतात. सत्ता ही त्या प्रतिनिधींच्या हातात राहते.(म्हणजे त्याच्या घरातच पक्ष कोणत्याही असो प्रतिनिधी तेच ते असतात "घराणेशाही" ) लोक ती सत्ता राबवू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे "प्रतिनिधी लोकांमधून जरी निवडून जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांचे उमेदवार नसतात. ते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार असतात. राजकीय पक्ष त्यांना हव्या त्या माणसांना उमेदवारी देतात; लोकांना योग्य वाटणाऱ्या माणसांना नाही. त्यामुळे ही खरे तर लोकशाही नसून पक्षशाही आहे" तशा व्यवस्थेत प्रतिनिधी उत्तरोत्तर बलदंड होत जातात आणि जनता मात्र दुबळी राहते. निवडणुका होत राहतात, पण प्रत्यक्षात मात्र लोकशाहीचा संकोच होत जातो. संसदीय लोकशाहीत प्रतिनिधी राज्य करतात हे स्वाभाविक आहे. परंतु त्या प्रतिनिधींवर राज्य कोण करणार हा प्रश्न शिल्लक राहतोच. भारतातील सध्याच्या लोकशाहीत तो पेच महत्त्वाचा आहे.
         त्यावरील एक उपाय भारतीय राज्यघटनेनेच सुचवलेला आहे. तो म्हणजे केवळ प्रातिनिधिक लोकशाहीवर अवलंबून न राहता तिला सहभागी लोकशाहीची जोड द्यावी. राज्यघटनेमध्ये जी 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती केली गेली तिच्या माध्यमातून ते साकार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सध्या तरी ती शक्यता स्थानिक पातळीवर म्हणजे गावामध्ये किंवा शहराच्या वॉर्ड पातळीवर अंमलात येऊ शकते. त्याला स्थानिक शासन किंवा स्वशासन म्हणतात. तेथे लोकांच्या प्रत्यक्ष आणि थेट सहभागातून कारभार व्हावा अशी अपेक्षा आहे. "गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव ह्या गावांच्या गोष्टी पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहेत – ‘गोष्ट मेंढा गावाची’ आणि ‘कहाणी पाचगावची’". त्या लहानशा आदिवासी गावांनी जे साध्य केले ते खरे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला करता येण्यासारखे आहे. ते त्यांना करणे शक्य व्हावे यासाठी राज्यघटनेच्या उद्दिष्टांनुरूप राज्यस्तरावरील कायद्यांमध्ये (उदाहरणार्थ, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम) योग्य ते बदल व्हायला पाहिजेत. घटनादुरुस्ती होऊन अनेक वर्षें लोटली असली तरी सरकारने ते अद्यापही केलेले नाहीत. तसे ते न केल्याने बाकीची गावे खरेखुरे स्वशासन प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. शहरी भागासाठी असणारी 74 वी घटनादुरुस्ती मुळातच सुस्पष्ट नाही. शहरी नागरिक तर अजूनही स्वशासनाच्या ध्येयापासून अनेक मैल दूर आहेत. सरकारने ते कायदे आणि नियम करावेत म्हणून, खरे तर, फार मोठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. त्या शिवाय लोकांचा शासनावरील ताबा वाढावा म्हणून इतरही बाबी आहेत. उदाहरणार्थ, स्वायत्त नियामक मंडळे किंवा प्राधिकरणे निर्माण करून त्या मार्फत प्रशासनावर अंकुश ठेवणे किंवा निवडणूक कायद्यात सुधारणा करून उमेदवारांना परत बोलावण्याची व्यवस्था (राइट टू रिकॉल) कार्यक्षम करणे, इत्यादी.
      भारत देशात खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य आणण्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की लोकांना ते या देशाचे मालक किंवा स्वामी आहेत या वस्तुस्थितीची जाणीव होणे. भारत हे प्रजासत्ताक आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण पुढाऱ्यांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे बघण्याची लोकांची दृष्टी अजूनही सरंजामशाही मनोवृत्तीची आहे. लोक जे प्रतिनिधी निवडून देतात - नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत - ते लोकांचे मायबाप, पोशिंदे किंवा राजे नसून पाच वर्षांच्या काळासाठी निवडलेले निव्वळ लोकसेवक आहेत ही भावना मनात दृढ व्हायला पाहिजे. त्यांची हांजी हांजी करणे, त्यांचा उदो उदो करणे किंवा त्यांची अग्रपूजा सामाजिक समारंभात करणे हे प्रजासत्ताकाच्या आशयाशी पूर्णपणे विसंगत आहे. नागरिक म्हणून लोकांनी ते करता कामा नये आणि तसे होणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेला मान्यता देता कामा नये.  म्हणून लोकांनी आता जागे झाले पाहिजे. 
       लोकशाहीत लोक मतदान करताना कोण उमेदवार उभे आहेत हे पाहून मत कोणाला द्यायचे याचा विचार करतात पण हे सगळे चुकीचे आहे. कारण उभे राहिलेले उमेदवार हे लोकशाही मार्गाने उभे राहिले नसतात. पक्षशाहीचे उमेदवार उभे राहिले आहेत. पण नागरिकांनी देश आपला आहे आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे समजून काम केले पाहिजे. लोकांना योग्य वाटणाऱ्या युवा उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी देऊन घराने तसेच पक्षशाही बंद केली पाहिजे.
       देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्ष रणांगण जिंकण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन प्रचार करत आहे. एकमेकांची उणीदुणी बाहेर काढत आहेत पण हा सगळा प्रपंच आहे तो मत मिळवण्यासाठी जनमत आपल्या बाजूला करण्यासाठी आणि हेच सुज्ञ मतदारांनी हे समजून घेतले पाहिजे. योग्य सक्षम आणि कार्यक्षम चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला निवडायला हवे. तुमच्या एका मताने अनेक अमुलाग्र बदल घडू शकतात. सरकारने आता तर मतदानादिवशी सुट्टी जाहीर केली आहे. एक दिवस आपल्या देशासाठी दिला पाहिजे जे बाहेर गावी आहेत त्यांनी एक दिवसाची तसदी घ्यावी लागेल पण हा देशाचा प्रश्न आहे. लोकशाहीन दिलेला अधिकार आहे. गावातील लोक तर मतदान करतातच एकांद चुकून राहते? राजकारणी लोक गाडी घेऊन उभे असतात. चला मतदान मलाच करा म्हणून उभे असतात, त्यातच गाडी घेऊन असतात. पण तुम्ही ते मत लाचारीने देऊ नये एकद्या उमेदवारांनी तुम्हाला काही पैसे दिले म्हणून त्याला मतदान देणे हा चुकीचा निर्णय आहे. तुमच्या पाच दिवसांच्या सोय केली. पण पुढील पाच वर्षे तुमचेच पैसे खाऊन जगतो? नाही पूर्ण जीवनाचे सार्थक करून बसतो. मी काही घ्यायला नको म्हणत नाही पण आपले मत कवडीमोल किमतीला विकू नका. ज्याच्यात नेतृत्वक्षमता आहे असाच उमेदवार निवडा आज देशाची परिस्थिती काय आहे 'देश म्हणजे घर आहे असे समजून मत द्या' नाहीतर वाट लागली म्हणून नुसते बोंबलत बसण्यात काही उपयोग नाही. 
            आता तर संपूर्ण सार्वजनिक क्षेत्रात खाजगी मालकीचे करण्यात सरकार व्यस्त आहे उद्योगपतीच्या गश्यात सार्वजनिक क्षेत्रातील हिस्सा दिले जात आहे. देशाच्या रक्त वाहिनी म्हणजे रेल्वे पण आता हे सरकारने रेल्वेही खाजगी कंपनीच्या हवाली केलेली आहे. यावर कुणी बोलताना दिसत नाही. मग देशाचे नागरिक या नात्याने या मतदारांनी विचार केलाच पाहिजे रेल्वे प्रवास गरीबांना परवडणारा होता आता मात्र तो महाग होणार आणि गरीब लोकांना रस्त्यावर उतरून चालत जावे लागणार आहे. अश्या अनेक गोष्टी सरकार खाजगी करत आहे त्यामुळे मतदारांनी जागे होऊन योग्य निवड केली पाहिजे पक्षाचे उमेदवार राहूदे गरीब नेतृत्वक्षम उमेदवार उभा करून आपला सहभाग दाखवून सरकार आपल्या ताब्यात घेतले पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतात या लोकशाही राज्या साठी आंबेडकर यांनी किती कष्ट घेतले आहे तसेच किती क्रांतिकारकानी जीवदान दिले आहे याचा विचार करून मतपेटीतून दाखवून द्यायचे आहे. पारावर बसायचा आणि नुसतंच बोंबलायचं यांना एवढे पैसे खाल्ले आणि त्याने तेवढे पैसे खाल्लं मी म्हणतो पैसे खाणार्‍याला मत देऊ नका ना तुम्ही.
        नोकरदार वर्ग हा सर्वसाधारणपणे बाहेरच असतो बाहेरगावी पुणे मुंबई अशा ठिकाणी गेलेला दिसतो. त्यांनी सुद्धा मतदान करण्यासाठी आले पाहिजे तुम्हाला नोकरीसाठी बाहेरगावी का जावे लागते याचा विचार करून निर्णय घ्यावा जर तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात औद्योगिक विकास झाला तर बाहेर कशाला जावे लागेल. आपल्या मतदारसंघात MIDC आणायला कोण उमेदवार विचार किंवा आणू शकतो अशा गोष्टीचा विचार करणाऱ्या लाच मतदान देण्यासाठी यावे. आपल्या शेतीसाठी प्रक्रिया उद्योग, शेतीसाठी मूलभूत गोष्टींची उपलब्धता झाली पाहिजे असे वाटते. पण त्याचा उपयोग फक्त आपल्या मित्रांसोबत बोलायचे कोण कुठला काय उपयोग नाही जो तो आपले घर भरतो कशाला मतदान द्यायला आपण जायचे? त्यांना आपलं आपल्याला काय म्हणून मतदान दुर्लक्ष करून कसे चालायचे? तुम्ही मत मांडता पण हे जर मग तुम्ही मतदान पेटीतून दावून दिले तर किती बदल होईल. तुमच्यातच युनियन तयार करून तुमच्यातला तुमच्यातले एखाद्याला उभे केले तर तुम्हाला हा लोकशाहीन दिलेला अधिकार आहे. कोणीही उभे राहून निवडून येऊ शकतो तुम्हाला कोण अडवतय. आता कोणी आडाणी राहिला नाही. सुशिक्षित बेरोजगार किती आहेत पदव्या घेऊन काय उपयोग एखाद्या मंत्र्याची मंत्र्यांना आमदार यांच्यामागे लागून चालणार नाही तो जर तुम्हाला काम मिळवून देत नसेल तर तुम्ही ते हिसकावून घेण्यासाठी युनिटी करून मतपेटीतून दाखवून द्यायचे आहे. 'तुम्ही आमचे काम करत नाही तर आम्ही तुमचे काम करत नाही' तुमच्यातून  सक्षम नेतृत्व तुम्ही उभा केले पाहिजे. जर तरुण पिढीने राजकारणाकडे दुर्लक्ष केले तर राजकारण कोण करणार, यामध्ये बदल घडवून कोण आणणार. "घराणेशाहीचे राजकारण बाप गेला की पोरगा पोरगा गेला नातू ही काय राजेशाही या त्यांची जहागीरदारी आहे" काय. सतत सत्ता त्यांच्याकडे म्हणून देशभरात भ्रष्ट कारभार सुरू आहे. त्याला जबाबदार नेते किंवा प्रशासकीय अधिकारी नव्हे तर हा मतदार जबाबदार आहे. मतदारच नको त्या माणसाला पैसे खाऊन निवडून देतोय.
      दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, दंगली याबद्दल नुस्ती पारावरती, मित्रांमध्ये चर्चा करून बोलून कसे चालणार यावर प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. चांगला उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे हे थांबवायचे असेल तर सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे. पडद्यावर काय दाखवले जाते आणि पडद्या पाठीमागे काय खेळखंडोबा असतो हे समजून घेतलं पाहिजे समजून घेणे गरजेचे आहे. आजही काही सामान्य नेतृत्व आहे पण त्यांना दाबण्याचा खूप प्रयत्न केला जातो. मंत्रीही झालेले आहे पण त्यांना काम करू दिले जात नाही संसदेत चांगले उमेदवार निवडून जाणे त्यासाठी गरजेचे आहे. म्हणूनच यासाठी मतदानातून शक्ती बाहेर काढली पाहिजे. मतदानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे राजकारणाला अनुभव असने म्हणजे पैसे कसे खायचे याचा अनुभव असणाऱ्याला मोठे नेते पाठिंबा देतात. पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला राजकारणी लोक डावलतात. मग मतदारांनी  ते आम्ही सक्षम उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे मतदानातून दाखवून द्यावे राजकीय लोकांनी डावले तर हे मतदारानी सावरले पाहिजे जर अश्या नेतृत्वाला मतदारांनी सुध्दा डावले तर हे बदल होणार कसे नामदारांच्या पोरसना अनुभव नसतो तरही नामदारांच्या मागे त्याचा पोरगा नामदार होतो मग कार्यकर्ते काय  नुसतं मरायला, संतरणज्या उचलायला, सेवा करायला असतात का? अनुभवाबद्दल दादा कोंडकेंनी उदाहरण देऊन सांगितले "पोरग पोरगी बघायला गेल्यावर पोरीच्या बापाने पोराला विचारायचं पोरगी दिली असती पण पोराला अनुभव काय" हा प्रकार आहे सामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना संपूर्ण तळागाळातील माहिती तसेच  गरिबांना काय त्रास आहे हे माहीत असूनही त्यांना संधी दिली जात नाही तेंव्हा अशा कार्यकर्त्यांस संधी देऊन बदल मतदारांनी केला पाहिजे.  कामात जिंद ठेवून काम केले की ते होतेच.
        मतदारांना मतदान कोणाला करायला हवे हेही कळेना झालेले  दिसते आहे. कारण ज्यांना मठात, आश्रमात, मंदिरात लोकांना भक्तीचा मार्ग दाखविला पाहिजे ते साधू संन्यासी आज संसदेत बसत आहेत. या साधू, संन्यासी लोकांना काय गरज आहे राजकारण करायची, संन्यासी म्हणजे काय हे तर त्यांना समजले तर बरे होईल संन्यासी म्हणजे संन्यास घेतलेल्या लोकांना मोह नसतो मोह, माया, स्वार्थ या गोष्टीवर विजय मिळविला आहे तो संन्यासी. आता राजकीय पक्ष आणि नेते याच्याशी संबंध व्यवहार करताना दिसतात. राजकीय पदाचा मोह करतात खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अशी पद उपभोगता आली पाहिजे यासाठी राजकारण करताना दिसतात. अशी अनेक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अशी अनेक पदे उपभोग घेत आहेत हे साधू, संन्यासी.  भारत हा देश सर्व धर्म समभाव देश आहे आणि तिथे हे धर्माचे राजकारण करणारे लोक आहेत. त्यामुळे मतदारांनी जागे होऊन योग्य निवड केली पाहिजे. बुवांनी राजकीय पक्ष आणि नेते यापासून दूर राहून लोकांचे, मानव जातीचे कल्याण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गलिच्छ राजकारण आणि राजकीय पक्ष, नेते यांना लोकांसाठी चांगले निर्णय तसेच काम करायला भाग पाडले पाहिजे. दिवसेंदिवस राजकारण गलिच्छ आणि हुकमी होते आहे ते होऊ नये यासाठी लोकांनी काय आणि कसे केले पाहिजे यासाठी लोकशाहीचे प्रबोधन बुवा महाराजांनी करून संतांच्या मनातील देवाची प्रार्थना केली पाहिजे पण त्यांना हेच कळत नाहीये की आपण राजकीय लोक नसून समाजाचे नेते किंवा नेतृत्व करणारे नसून आपण लोकांना योग्य मार्गदर्शन करणारे साधू, संन्यासी आहोत संताचे विचार आणि धर्माचा प्रचार करणारे स्वामी आहोत हेच आमचे काही बुवा लोक विसरून राजकारणात उतरले आहेत. दाखवतात वरून साधू पण आतून आहेत भोंदू , ऐयाशीं, अश्लील चाळे करणारे. साधू लोकांनी किती माया जमा केली आहे ते आपण पाहिले आहे न्युज वर उदाहरण.  रामरहीम, आसाराम...... असे कितीतरी साधू आहेत त्यांनी राजकीय वरदहस्त मिळवला आहे. ह्या सगळ्या लोकांना काय गरज आहे असल्या गोष्टींची त्यांना हौस असेल राजकारण करण्याची तर त्यांनी ते वस्त्र साधूंचा बुरखा काढून राजकारण करावे. अश्या लोकांना मतदारांनी डावलने गरजेचे आहे तुम्हाला लोकशाहीन अधिकार दिला आहे.  साधू, संन्यासी मतदारसंघात काय नुसते देऊळ, मठ बांधण्याचे काम करणार काय नवीन पिढीला शिक्षण, आरोग्य, विज्ञानाच्या अभ्यास कसा होणार. सर्वधर्मीय राज्यात धार्मिक लोक कसे काय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतील साधू, संन्यासी लोकांना फक्त धर्म प्रसार करायचा असतो ते प्रशासन कसे सांभाळून घेतील त्यामुळे सुज्ञ मतदारांनी मतदान विचार करून निर्णय घ्यावा. बुवांना राजकीय वातावरणापासून दुर केले पाहिजे. मठात बसण्यार्यानी संसदेत देश एकसंध आणि आर्थिक भक्कमपणे चालणार नाही. 
         सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी घोटाळे होतातच. आदर्श घोटाळा,  राफेल, टुजी , सिंचन घोटाळा असे अनेक घोटाळे होतात त्यातून करोडो रुपये हे राजकीय लोक स्वस्त बसून खातात. या लोकांना कोण विचारतो शेतकरी कर्जमाफी करायला सरकारी तिजोरीत खडखडाट असतो मात्र उद्योगपतीच्या कर्जमाफीवेळी तिजोरीत पैसे कुठून येतात हे नेतेमंडळींनाच माहीत? म्हणून हे माहीत करण्यासाठी मतदारांनी मतदान विचार करून केले पाहिजे. नाहीतर सामान्य माणूस राजकारणात पाठविला पाहिजे. लोकांनीच आपल्या मधील नेतृत्व सक्षम युवकांना पुढे करून निवडणुकीत निवडणूक आणणे गरजेचे आहे. मग हे घोटाळे, कर्जमाफी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सुविधा उपलब्ध होतील आणि गरीबी कमी होण्यास मदत होईल. तुमच्यातच युनियन तयार करून तुमच्यातला माणूस राजकारणात असला पाहिजे. घराणेशाहीचे राजकारण बाप गेला की पोरगा, पोरगा गेला नातू ही काय राजेशाही आहे काय हे बंद करणे गरजेचे आहे.  खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने सामान्य माणूस संसदेत बसवून मतदारांनी राज्य आपल्या हातात घेतले पाहिजे.  
       मतदारांना जागृत करण्याचे कितीतरी मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत पण आजही सुशिक्षित मतदार योग्य उमेदवाराची निवड करत नाही. म्हणून हे दहशतवाद नक्षलवाद होत आहेत सिनेमातूनही लोकांना मार्गदर्शन केलेले दिसते. पण लोक ते मनोरंजन म्हणून पाहतात. इतिहास विसरू लागलेत "शिवरायांनी कसे शून्यातून विश्व निर्माण केले" तेव्हा तेव्हा तर राजेशाही होती आता लोकशाही आहे तुम्हाला अधिकार असताना अधिकाराचा दुरुपयोग होताना दिसते. सामान्य नेतृत्व नेतृत्व सक्षम युवकांनी पुढे येऊन ही लोकशाही योग्य रूळावर आनली पाहिजे.
       लोकशाहीतील जनताही अनुस्पोट आहे त्याला टिनंगी देण्याचे काम या युवा वर्गाने केले पाहिजे. लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून युवकांनी देश  ताब्यात घेऊन देशाच्या सुधारण्याची घडी बसविली पाहिजे.'ज्यांनी हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी प्राणाची आहुती दिली रक्त्त सांडली त्यांच्या आत्म्याला शांती दिली पाहिजे' असा भोंगळ कारभार करणा-यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे जो देश हितासाठी काम करील त्यालाच मतदान दिले पाहिजे देशात बदल घडवण्याची संधी ही मतदानातून करून दाखवून दिली पाहिजे.  नवीन नेतृत्वाला संधी द्या विकास दारात घेऊन येईल अशा उमेदवाराला मत द्या. किती  दिवस दुसऱ्यावर विसंबून राहणार. 
         मतदान हा तुमचा हक्क आहे 
           तो तुम्ही बजावला पाहिजे 
               मी बजवणार
                आता बद्दल हवा
   योग्य उमेदवारालाच मतदान करा..


सरगर सुरेश सिताबाई किसन 
मो. 8605871150 / 9595279796

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कोरोना एक अफवाच

Right To Vote