Posts

Showing posts from October, 2022

देश बदलतोय

                 देश बदलतोय माझ्या देशात बदल घडतोय आम्ही मात्र भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणारा नेता,  आपल्याच मित्रांना देश विकतोय  भारतीय नागरिक टॅक्स भरतोय,  त्याचा वापर उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठी होतोय माझा शेतकरी राजा मात्र झाडालाच लटकतोय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या,  क्रांतीवीरांनी स्वीकारलेली आदर्श मिश्र अर्थव्यवस्था,  भांडवलदारांच्या घशात घालतोय खरंच माझ्या देशात बदल घडतोय  सार्वजनिक मालमत्ता विकून काय साध्य करतोय लोकशाहीस पूरक मिश्र अर्थव्यवस्था  गांधी नेहरू आंबेडकरांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वीकारली होती,  हे लोकशाहीचा राजा कसा काय विसरतोय लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवणारा तरुण देशद्रोही ठरतोय खरंच माझ्या देशात बदल घडतोय सत्ताधारी पक्ष विरोधक संपवण्यासाठी आपली मनमानी  करतोय हुकुमशहा बनण्याचे स्वप्न पाहतोय विरोधी पक्ष नेता उघडपणे सत्ताधारी पक्षात,  जाहीर पक्ष प्रवेश करून मंत्री होतोय सुज्ञान नागरिक लोकशाहीत काहीतरी घोळ सुरू आहे,  हे पाहण्याचे कसे काय विसरतोय वाटेल त्या किंमतीला लोकप्रतिनिधींचा बाजार होतोय भुल,आमिषाला बळी न पडणा

माय मराठी

              मराठी मराठी भाषा संवर्धनाचा विषय राज्यभर गाजतोय इंग्रजी शाळांना टाळा कोण ठोकतोय मराठी शाळेचा पट दिवसेंदिवस घडताना दिसतोय इंग्रजी चा बाजार कुठे हटतोय. श्रीमंत लोक पैसे भरून आपले मूल इंग्रजी शाळेत घालतोय जागतिक भाषेचा अभ्यास करतोय,  म्हणून सारगावभर ओरडतोय. मराठी शाळेतील इंग्रजी विषय या लोकांना कसा काय दिसत नसतोय. पळवाटेचे उत्तर सांगतोयस,   मराठी भाषेचा आता विचार कोण करतोय जो माणूस मराठी शिकून सरकारी सेवेत कार्यरत होतोय  तो सुद्धा इंग्रजीचा रस्ता धरतोय  टीव्हीसमोर विद्यार्थी कुठे हटतोय  मग मराठी वाचनाचा प्रश्न कुठे उरतोय  नेटवरून चॅटिंग करणारा विद्यार्थी शाळेकडेच दुर्लक्ष करतोय  मराठी साहित्य वाचण्याचा प्रश्न शिल्लक कुठे राहतोय  मराठीचा अनेक दिवसांचा इतिहास आपण विसरतोय मराठी माणूस म्हटलं की जगभरातील शत्रूच्या मनात धडकी भरणारा मराठी माणूस मराठी विसरतोय मराठी भाषा संवर्धन खात्याचा प्रमुख त्याचा मुलगाही इंग्रजी शाळेत दिसतोय केंद्रीय पात्रता परीक्षा मराठीत व्हावे यासाठी किती मोठा लढा उभारतोय आपण तरीही इंग्रजीकडे पळतोय एका मताने राष्ट्रभाषेचा स्पर्धेतून बाहेर पडलेली आपली भाषा मरा