Posts

Showing posts from February, 2021

आंदोलन

  आंदोलन      कोंबड्यानं बांग दिली अन् लगीच जागा झालू गजर झाल्याचं कळलं. आता कोंबड्यांन घायच  धरली हुती अन् भाईर कडाक्याची थंडी हुती. ह्यो गजर काय बंद हुतूया व्हय ? मोबाईलच घड्याळ बंद करता तर येतय, पर हे कुणी बंद करणार ? कारण मला या फुकटच्या घड्याळाची सवय झालेली. आता काय आमची पोरं मोबाईल वाजवत्यात पर हे मोबाईल बिबाईल, घड्याळ-बिड्याळ आम्हाला काय समजत नाय. आमचे हे फुकाटचं घड्याळ कधी खोटं टायमं सांगत नाय, कधी बंद भी पडत नाय, अन् पुढ-मागं बी व्हतं न्हाय. आमचं घड्याळ वर आभाळात सुर्य बघितला की लगीच काटा कुठाय ते म्या टाईम सांगतू. मोबील मधलं मला काय कळत न्हाय. म्या पोराला घिऊन दिलाय तेच्या हातात बघूनच. मन बाहरावून जातयं. च्यायला म्या उगीच बसलुया आज काय 'शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी' आंदोलन का काय ते हाई रस्ता बंद करायचाय म्हंण तिकडं जायचं हाय. गाडी जाईल पर घरचं शेणघान कोण ते मोर्चेकरी काढणार हायत व्हय? आपलं काम आपल्यालाच केलं पाहीजी.         "आवं उठला का न्हाय ? काय असचं दिसभर झोपायचं हाय व्हय ?"        "अगं व्हय, म्या आलोच जरा शान काढून खराटा मारतू की."          मग क