वरुण राजा

 

वरूण राजा

कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर
अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त
गावच्या गाव घेतली आहेस कव्हेत
सुंदर बांधलेले घरही आहे पवत
स्वतःच्या घरातही बसून मृत्यूला,
यमालाही लावावे लागते पळवत
यमही जाताना माझ्या काही बांधवांना घेऊन गेला कव्हेत जीवापाड प्रेम करणारी जनावरे मरून फुगून आहे पवत. 

वरून राजा इतका का वाईट वागतो क्रुर
कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर
माणगंगा का आहे पाण्यापासून दुर
दुष्काळी पट्टा काही पाण्यापासून दूर
जत कवठेमहांकाळ आटपाडीने कुठे पाहिला आहे पुर. 


मराठवाड्यात का बर जात नाही? तू ते लय आहे का दूर कृष्णामाई पंचगंगापासून जत आटपाडी लय आहे का दुर
वरून राजा तू अशी का करतोस चेष्टा क्रुर
पूरग्रस्तांच्या अश्रूकडे तर पाहून जा दुर
कोणाला पाण्यासाठी, कोणाला पाण्यापासून रडतोस इतकी का वाईट चेष्टा करतो क्रुर
एकदाशी येऊदे या महाराष्ट्रात, भारत, जगात
आनंद अश्रूंचा महापुर
नको आहे पाण्याचा महापुर वरून राजा...

कवी सरगर सुरेश सिताबाई किसन (SK)
मो. 8605871150

कवितेत चुक असेल तर सुचना करा. आणी आवडली तर कमेंट शेअर करा


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान

Right To Vote

कोरोना एक अफवाच