देश बदलतोय

                 देश बदलतोय

माझ्या देशात बदल घडतोय

आम्ही मात्र भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय

अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणारा नेता, 

आपल्याच मित्रांना देश विकतोय 

भारतीय नागरिक टॅक्स भरतोय, 

त्याचा वापर उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठी होतोय

माझा शेतकरी राजा मात्र झाडालाच लटकतोय

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, 

क्रांतीवीरांनी स्वीकारलेली आदर्श मिश्र अर्थव्यवस्था, 

भांडवलदारांच्या घशात घालतोय

खरंच माझ्या देशात बदल घडतोय 

सार्वजनिक मालमत्ता विकून काय साध्य करतोय

लोकशाहीस पूरक मिश्र अर्थव्यवस्था 

गांधी नेहरू आंबेडकरांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वीकारली होती, 

हे लोकशाहीचा राजा कसा काय विसरतोय

लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवणारा तरुण देशद्रोही ठरतोय

खरंच माझ्या देशात बदल घडतोय

सत्ताधारी पक्ष विरोधक संपवण्यासाठी आपली मनमानी  करतोय

हुकुमशहा बनण्याचे स्वप्न पाहतोय

विरोधी पक्ष नेता उघडपणे सत्ताधारी पक्षात, 

जाहीर पक्ष प्रवेश करून मंत्री होतोय

सुज्ञान नागरिक लोकशाहीत काहीतरी घोळ सुरू आहे, 

हे पाहण्याचे कसे काय विसरतोय

वाटेल त्या किंमतीला लोकप्रतिनिधींचा बाजार होतोय

भुल,आमिषाला बळी न पडणाऱ्या नेत्यांवर, 

ईडी सीबीआय सारख्या धाढी टाकून मनमानी करतोय

ईडी.सीबीआयचा वापर फक्त विरोधी नेत्यांसाठीच का होतोय? 

सत्ताधारी पक्षात सहभागी झालेले आणि सत्ताधारी नेतृत्व, 

धुतल्या तांदळासारखे स्वच्छ ईडीच्या अधिकाऱ्यांना कसा काय दिसतोय

खरंच माझ्या देशात बदल घडतोय आम्ही मात्र महा सत्तेचे स्वप्न पाहतोय


शेतकऱ्यांचा पोरगा सरकारी नोकरीसाठी धडपडताना पाहतोय

सार्वजनिक क्षेत्र खाजगीकरण करून त्याच्या स्वप्नावरही पाणी फिरवतोय

अग्निवीर सारखी योजना माती मारतोय? 

क्रांतीच्या संघर्षाच्या मातीत जन्मलेला तरुण सुद्धा, 

आज मोबाईल सोशल मीडिया मध्येच अडकून राहतोय

एकसंध लढा देण्याचा विचार कोणाच्याही डोक्यात नसतोय

खरंच माझा देश बदलतोय

लोकशाही धोक्यात मिश्र अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या घश्यात,

सुभाष चंद्र गांधी नेहरू भगतसिंग यासह अनेक क्रांतिवीरांच्या ,

देशातील तरुण सुज्ञान नागरी शांतच बसलेला दिसतोय

खरचं माझ्या देशात बदल घडतोय

 आम्ही मात्र महा सत्तेचे स्वप्न पाहतोय. 



कवी :- सुरेश सिताबाई किसन सरगर

मो. नं. :- 8605871150

मु. पो.  :- घाटनांद्रे ता. कवठे महांकाळ जि. सांगली


Comments

Popular posts from this blog

मतदान

Right To Vote

कोरोना एक अफवाच