माय मराठी

              मराठी

मराठी भाषा संवर्धनाचा विषय राज्यभर गाजतोय

इंग्रजी शाळांना टाळा कोण ठोकतोय

मराठी शाळेचा पट दिवसेंदिवस घडताना दिसतोय

इंग्रजी चा बाजार कुठे हटतोय.

श्रीमंत लोक पैसे भरून आपले मूल इंग्रजी शाळेत घालतोय

जागतिक भाषेचा अभ्यास करतोय, 

म्हणून सारगावभर ओरडतोय.

मराठी शाळेतील इंग्रजी विषय या लोकांना कसा काय दिसत नसतोय.

पळवाटेचे उत्तर सांगतोयस,  

मराठी भाषेचा आता विचार कोण करतोय

जो माणूस मराठी शिकून सरकारी सेवेत कार्यरत होतोय 

तो सुद्धा इंग्रजीचा रस्ता धरतोय 

टीव्हीसमोर विद्यार्थी कुठे हटतोय 

मग मराठी वाचनाचा प्रश्न कुठे उरतोय 

नेटवरून चॅटिंग करणारा विद्यार्थी शाळेकडेच दुर्लक्ष करतोय 

मराठी साहित्य वाचण्याचा प्रश्न शिल्लक कुठे राहतोय 

मराठीचा अनेक दिवसांचा इतिहास आपण विसरतोय

मराठी माणूस म्हटलं की जगभरातील शत्रूच्या मनात धडकी भरणारा मराठी माणूस मराठी विसरतोय

मराठी भाषा संवर्धन खात्याचा प्रमुख त्याचा मुलगाही इंग्रजी शाळेत दिसतोय

केंद्रीय पात्रता परीक्षा मराठीत व्हावे यासाठी किती मोठा लढा उभारतोय

आपण तरीही इंग्रजीकडे पळतोय

एका मताने राष्ट्रभाषेचा स्पर्धेतून बाहेर पडलेली आपली भाषा मराठी,आपण आपल्या राज्यातही तिचे संवर्धन करायला कसे काय विसरतोय ....


कवी :- सरगर सुरेश सिताबाई किसन ( SK )

 मो. नं. 8605871150/9595279796



Comments

Popular posts from this blog

मतदान

Right To Vote

कोरोना एक अफवाच