Posts

देश बदलतोय

                 देश बदलतोय माझ्या देशात बदल घडतोय आम्ही मात्र भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणारा नेता,  आपल्याच मित्रांना देश विकतोय  भारतीय नागरिक टॅक्स भरतोय,  त्याचा वापर उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठी होतोय माझा शेतकरी राजा मात्र झाडालाच लटकतोय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या,  क्रांतीवीरांनी स्वीकारलेली आदर्श मिश्र अर्थव्यवस्था,  भांडवलदारांच्या घशात घालतोय खरंच माझ्या देशात बदल घडतोय  सार्वजनिक मालमत्ता विकून काय साध्य करतोय लोकशाहीस पूरक मिश्र अर्थव्यवस्था  गांधी नेहरू आंबेडकरांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वीकारली होती,  हे लोकशाहीचा राजा कसा काय विसरतोय लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवणारा तरुण देशद्रोही ठरतोय खरंच माझ्या देशात बदल घडतोय सत्ताधारी पक्ष विरोधक संपवण्यासाठी आपली मनमानी  करतोय हुकुमशहा बनण्याचे स्वप्न पाहतोय विरोधी पक्ष नेता उघडपणे सत्ताधारी पक्षात,  जाहीर पक्ष प्रवेश करून मंत्री होतोय सुज्ञान नागरिक लोकशाहीत काहीतरी घोळ सुरू आहे,  ...

माय मराठी

              मराठी मराठी भाषा संवर्धनाचा विषय राज्यभर गाजतोय इंग्रजी शाळांना टाळा कोण ठोकतोय मराठी शाळेचा पट दिवसेंदिवस घडताना दिसतोय इंग्रजी चा बाजार कुठे हटतोय. श्रीमंत लोक पैसे भरून आपले मूल इंग्रजी शाळेत घालतोय जागतिक भाषेचा अभ्यास करतोय,  म्हणून सारगावभर ओरडतोय. मराठी शाळेतील इंग्रजी विषय या लोकांना कसा काय दिसत नसतोय. पळवाटेचे उत्तर सांगतोयस,   मराठी भाषेचा आता विचार कोण करतोय जो माणूस मराठी शिकून सरकारी सेवेत कार्यरत होतोय  तो सुद्धा इंग्रजीचा रस्ता धरतोय  टीव्हीसमोर विद्यार्थी कुठे हटतोय  मग मराठी वाचनाचा प्रश्न कुठे उरतोय  नेटवरून चॅटिंग करणारा विद्यार्थी शाळेकडेच दुर्लक्ष करतोय  मराठी साहित्य वाचण्याचा प्रश्न शिल्लक कुठे राहतोय  मराठीचा अनेक दिवसांचा इतिहास आपण विसरतोय मराठी माणूस म्हटलं की जगभरातील शत्रूच्या मनात धडकी भरणारा मराठी माणूस मराठी विसरतोय मराठी भाषा संवर्धन खात्याचा प्रमुख त्याचा मुलगाही इंग्रजी शाळेत दिसतोय केंद्रीय पात्रता परीक्षा मराठीत व्हावे यासाठी किती मोठा लढा उभारतोय आपण तरीही...

वरुण राजा

  वरूण राजा कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त गावच्या गाव घेतली आहेस कव्हेत सुंदर बांधलेले घरही आहे पवत स्वतःच्या घरातही बसून मृत्यूला, यमालाही लावावे लागते पळवत यमही जाताना माझ्या काही बांधवांना घेऊन गेला कव्हेत जीवापाड प्रेम करणारी जनावरे मरून फुगून आहे पवत.  वरून राजा इतका का वाईट वागतो क्रुर कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर माणगंगा का आहे पाण्यापासून दुर दुष्काळी पट्टा काही पाण्यापासून दूर जत कवठेमहांकाळ आटपाडीने कुठे पाहिला आहे पुर.  मराठवाड्यात का बर जात नाही? तू ते लय आहे का दूर कृष्णामाई पंचगंगापासून जत आटपाडी लय आहे का दुर वरून राजा तू अशी का करतोस चेष्टा क्रुर पूरग्रस्तांच्या अश्रूकडे तर पाहून जा दुर कोणाला पाण्यासाठी, कोणाला पाण्यापासून रडतोस इतकी का वाईट चेष्टा करतो क्रुर एकदाशी येऊदे या महाराष्ट्रात, भारत, जगात आनंद अश्रूंचा महापुर नको आहे पाण्याचा महापुर वरून राजा... कवी सरगर सुरेश सिताबाई किसन (SK) मो. 8605871150 कवितेत चुक असेल तर सुचना करा. आणी आवडली तर कमेंट शेअर करा

Covid 19 rumour

                    Corona is a from of froud      Please stop Watching covid 19 newz we are the sculpors of our own health.  Leave the mask, sanitizer.  Find out why your health is deteriorating.  80% Of human health problems because of fear, stress, tension, anxiety.     Heart attack  , BP, sugar, such serious illnesses occur.  Man himself is the cause of his illness.  Positive attitude, need to think .  The thinke also says that the fear in a man's mind does not allow him to move forward.  Fear of death is also hig her in covid 19 patients Fear must be Remvoed from the mind.  Social media and corona should stop watching the news corona wan't,  The number of patients is now increasing rapidly during this period of lockdown.  An empty head become satan's home.  In his spare time covid 19 should not think about this subject and should be engagen in ...

Right To Vote

Choose democracy by stopping bias       Although the people's representatives are elected by the people, in the real sense, they are not the candidates of the people.They are candidates of different political parties.Political parties nominate the men they want; Not to people who think people are right.So it is not democracy but partisanship.In such a system the representatives become more and more strong and the masses remain weak.       After independence, India adopted the example of representative, parliamentary democracy. As India is a fragmented country, there is no alternative but to adopt representative democracy to rule at the central and state levels.But what is the experience of the people about democracy seventy years after independence? So it is of despair, helplessness and weakness as a citizen.Elections are held regularly in the country, but with each election, the frustration grows.People's faith in the electoral system has waned.Why is this...

आंदोलन

  आंदोलन      कोंबड्यानं बांग दिली अन् लगीच जागा झालू गजर झाल्याचं कळलं. आता कोंबड्यांन घायच  धरली हुती अन् भाईर कडाक्याची थंडी हुती. ह्यो गजर काय बंद हुतूया व्हय ? मोबाईलच घड्याळ बंद करता तर येतय, पर हे कुणी बंद करणार ? कारण मला या फुकटच्या घड्याळाची सवय झालेली. आता काय आमची पोरं मोबाईल वाजवत्यात पर हे मोबाईल बिबाईल, घड्याळ-बिड्याळ आम्हाला काय समजत नाय. आमचे हे फुकाटचं घड्याळ कधी खोटं टायमं सांगत नाय, कधी बंद भी पडत नाय, अन् पुढ-मागं बी व्हतं न्हाय. आमचं घड्याळ वर आभाळात सुर्य बघितला की लगीच काटा कुठाय ते म्या टाईम सांगतू. मोबील मधलं मला काय कळत न्हाय. म्या पोराला घिऊन दिलाय तेच्या हातात बघूनच. मन बाहरावून जातयं. च्यायला म्या उगीच बसलुया आज काय 'शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी' आंदोलन का काय ते हाई रस्ता बंद करायचाय म्हंण तिकडं जायचं हाय. गाडी जाईल पर घरचं शेणघान कोण ते मोर्चेकरी काढणार हायत व्हय? आपलं काम आपल्यालाच केलं पाहीजी.         "आवं उठला का न्हाय ? काय असचं दिसभर झोपायचं हाय व्हय ?"       ...

कोरोना एक अफवाच

           दिस पाक डोक्यावर यायची येळ झालिया परंतु ही बुरगांट काय उघडायचं नाव घेईना.आन तुम्ही मात्रूर घरातन हलीना झालाय हुई जनावर सोडायचा काय ईचार नाय व्हय त्याच् वरडन तर कानात शिरत कि नाय, आव उठाकी म्हणत मालकीण आली माझ्याकडे म्या मात्र कोपऱ्यात बसलू हुतू गार्टून ती म्हणायला लागली या पावसाच्या गांडीला बुळकी लागल्याय याचं काय दार लावायचं का? धड रफा-रफा ईऊन पाणी काढून जात बी नाहय, धड उघडत बी नाय. नुसतं बुळू-बुळू चालू झालय जनावरास बी हिंडू देत नाय, का माणसाला कुठला काम धंदा बघू देत नाय.हेला काडी मी लावली मालकिणीच तोंड सुरू हुतं म्या थांबवत म्हणलं अगं हौशे ती घोंगडं आण म्या त्याची ख्वाळ करून घितू. मला जरा जनावरं सोडू लाग मलाबी जनावरा आशी उपाशी ठिवून बसू वाढतय वय, अगं नुसती फिरवून तर आणली पाहिजेत कि नाय. आता तसं बघायला गेलं तर हे झिरमाट चालू हाय  म्हणल्यावर कुठलं जनावर तर हिंडणार हाईत. तु आपली जनावरांना घेऊन चल जरा पुढे त्या राम्याची म्या घेऊन आलू ग, त्यांन मला सांगून गेलाय त्याच्या पोरगीला बरं नाय  डाक्टरकड घिऊन गेलाय. पण तुम्ही म्हणताय घिऊन गेल्याती....